स्थापना दिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव, मान्यवरांकडून गौरवोद्गार
बेळगाव : ठाणे जनता सहकारी बँकेच्या बेळगाव शाखेची सेवा आपुलकीची आहे, असे गौरवोद्गार प्रसिद्ध सीए एन. जी. गाडगीळ यांनी काढले.
ठाणे जनता सहकारी बँकेच्या 51 बेळगाव शाखेत दि. 6 रोजी स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी यावेळी गाडगीळ बोलत होते. समाजातील विविध मान्यवरांनी व बँकेच्या ग्राहकांनी उपस्थित राहून बँकेला शुभेच्छा दिल्या.
उद्योजक प्रेमचंद लेंगडे, तुकाराम बँकेचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, दीपक देशपांडे, उपाध्यक्ष प्रदीप ओऊळकर, सामाजिक कार्यकर्ते विकास कलघटगी, मोहन मुर्कीभावी, ‘वीरवाणी’चे व्यवस्थापक रामचंद्र एडके, पत्रकार सुनील आपटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
बँकेच्या शाखा महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात या राज्यात आहेत. याचा विस्तार आता देशभरातील राज्यात व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करुन एडके यांनी शुभेच्छा दिल्या. लेंगडे, मरगाळे, ओऊळकर, कलघटगी आदींनी विचार व्यक्त केले. बेळगावात उद्यमबाग परिसरात बँकेची शाखा व्हावी, अशी अपेक्षाही मान्यवरांनी व्यक्त केली.
उद्योजक दिलीप चिटणीस, माहेश्वरी अंधशाळेचे चिटणीस आनंद जोशी, प्राचार्या अनिता गावडे व विद्यार्थी, आधार हॉस्पिटलचे डॉ. दशरथ बामणे, श्रीमती पुष्पा सुरेश हुंदरे, उद्योजक मदनमोहन कवठेकर, माजी महापौर विजय मोरे, कुमार पाटील, सह्याद्री पतसंस्थेच्या व्यवस्थापिका सुरेखा आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रमोद देशपांडे यांनी बँकेच्या प्रगतीची व कामकाजाची माहिती स्वागतपर भाषणात दिली. दिवसभर समाजातील विविध घटकातील मान्यवर, शिक्षक, शिक्षिका आदींनी शाखेमध्ये येऊन शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी सकाळी राजु माने व सुजाता माने यांच्या हस्ते सत्यनारायणची पूजा पार पडली.
Belgaum Varta Belgaum Varta