बेळगाव : बेळगाव व आजूबाजूच्या परिसरात अमली पदार्थाच्या विळख्यात तरुण पिढीला ओढलं जात आहे. शाळा कॉलेज यांना टार्गेट करून तरुण पिढीला अमली पदार्थाचे व्यसन लावले जात आहे. अमली पदार्थाचे सेवन तरुण पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अमली पदार्थाच्या सेवनापासून तरुणांना दूर ठेवण्याची खूप आवश्यकता आहे. या कामाची जबाबदारी पोलीस यंत्रणेकडे असून देखील पोलीस यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत आहे. हे सर्व पाहता श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडूस्कर यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण पुराव्यासहित हे रॅकेट कसे काम करते हे दाखवून दिले आहे. या रॅकेटमध्ये कोण कोण कसे काम करते व पोलीस यंत्रणा यांना कसे पाठिमागे घालते हे देखील सांगून दिले आहे. अशा गुन्हेगारीच्या विरोधात निडर व्यक्तिमत्त्वाची गरज आहे. सध्याच्या काळात ती व्यक्ती म्हणजे रमाकांत कोंडुस्कर हे आहेत. काही लोक समाजाला विनाशाच्या खाईत घालत असताना त्यांच्या विरोधात उभे राहून तरुणांना चांगल मार्गदर्शन करण्याचं काम रमाकांत कोंडुस्कर हे करत आहेत. या गुन्हेगारीच्या व्यवहाराविरुद्ध एकट्याने विरोध करणं शक्य नाही. रमाकांत कोंडुस्करांची एक स्वतःची अशी संघटना आहे की ज्यामुळे ते या गुन्हेगारी व्यवहाराविरुद्ध लढू शकतात व त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांचा खूप मोठा प्रतिसाद मिळतो. आणि तेच असे धाडस करू शकतात. रमाकांत कोंडुस्कर यांच्या जीवनशैलीचा एक भाग म्हणजे ते स्वतःही व्यसनांपासून दूर राहतात व इतरांनाही दूर राहण्याचे मार्गदर्शन करतात. हे कार्य करण्यामागे रमाकांत कोंडुस्कर यांचा कोणताही स्वार्थ नाही. त्यांचे असे म्हणणे आहे की आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो त्यासाठी आपण समाजासाठी काहीतरी करायलाच हवे. त्यांनी केलेल्या कारवाईमुळे बेंगलोर पर्यंत याचे पडसाद उमटले आहेत. पोलीस यंत्रणेवर कारवाई केली जाईल असेही समजले आहे. पोलीस प्रशासनाला एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे की कोणीतरी आम्हाला विचारणारा आहे. त्यामुळे समाजाभिमुख रमाकांत कोंडुस्कर यांच्या कामाची दखल प्रशासनाबरोबरच नागरिकांनीही घेतलेली आहे. कारण देशाचं पुढचं भवितव्य तरुण पिढी आहे. आणि या तरुण पिढीला व्यसनापासून दूर नेलं पाहिजे व याची जबाबदारी रमाकांत कोंडुसकर यांनी घेतली आहे हे सत्य आहे. आणि रमाकांत कोंडुस्कर यांच्या या भूमिकेला समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकांनी पाठिंबा दिला पाहिजे. कारण समाज स्थिर करण्याचा, उच्च शिक्षित करण्याचा, समृद्ध करण्याचा त्याचबरोबर समाज सुसंस्कृत करण्याचा हा एक मार्ग आहे. यासाठी समाजानेही अशा प्रकारे कोण जर लढा देत असेल तर त्याला संपूर्ण पणे पाठिंबा देण्याची गरज आहे व त्यांचे हात बळकट करण्याची गरज आहे.
Belgaum Varta Belgaum Varta