बेळगाव : पिरनवाडी येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलाविण्यात आली असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे.
सोमवार दिनांक १३ रोजी सायंकाळी ६-०० वाजता रामदेव गल्ली येथील राम मंदिर येथे बैठक बोलाविण्यात आली असून बाळगमट्टी, खादरवाडी, मच्छे, मजगाव, झाडशहापूर, अनगोळ येथील स्थानिक नेते तसेच कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे महाराष्ट्र एकीकरण समिती पिरणवाडी विभाग यांनी अवाहन केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta