येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने सोमवार (ता. 20) फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 8-00 वाजता परमेश्वर नगर येळ्ळूर येथील संमेलन स्थळी राधानगरी येथील ‘गीतराधाई उत्सवशाही’ हा भव्य दिव्य असा मराठमोळा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मराठमोळ्या लोकसंस्कृतीचा सुवर्णमय इतिहास दर्शविणारा हा सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. विसरत चाललेल्या रूढी परंपरांची आठवण व जाणीव करून देणारा हा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा इतिहास दाखविला जाणार आहे,, या कार्यक्रमात सांगेतिक व मनोरंजनात्मक सांगड प्र घालण्यात आली आहे. या कार्यक्रमात बळीराजाच्या पहाटेच्या ओवी, भूपाळी, शेतकरी गीते, लावणी, कोळी गीते, धनगर व आदिवासी देवतांचा जागर -गोंधळ या कार्यक्रमात आपल्याला पाहायला मिळणार आहे, सुमधुर संगीत, बहारदार नृत्याविष्कार प्रत्येकाला हसून लोटपोट करायला लावणारा हा सांस्कृतिक कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे अशा या भव्य दिव्य कार्यक्रमाचा आस्वाद येळ्ळूर व परिसरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन साहित्य संघाच्या वतीने करण्यात आले आहे.