बेळगाव : येथील श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या शुक्रवारपासून रात्री 12 नंतर पंचामृत अभिषेकाला सुरुवात होणार आहे. श्री कपिलेश्वर महादेव ट्रस्टच्या वतीने पहिला अभिषेक समस्त बेळगावकर नागरिकांच्या साठी करण्यात येणार आहे. त्यानंतर पहाटे पाच वाजेपर्यंत पंचामृत अभिषेक सुरू राहणार आहे. त्यानंतर रुद्राभिषेक करण्यात येणार आहे रुद्राभिषेक झाल्यानंतर त्रिकाल पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
त्रिकाल पूजा झाल्यानंतर महाशिवरात्रीची विशेष महाआरती सायंकाळी 8 वाजता करण्यात येणार आहे. सालाबाद प्रमाणे दिनांक 19 रोजी 28 वा महाप्रसाद आयोजित केलेला आहे. सर्व शिवभक्तांनी दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावं असं ट्रस्टच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta