
बेळगाव : सोमवार दिनांक 27 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बेळगावला नवीन रेल्वे स्थानकाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य सरकार व पंतप्रधान कार्यालयाने मान्यता दिलेल्या विविध कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेळगाव दौऱ्यात दरम्यान रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रोड शो एसपीजी परवानगी असलेल्या मार्गावर असणार आहे. मालिनी सीटी मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेणे बाबतची नियोजन आहे. तिथूनच रेल्वे स्थानकाचा लोकार्पण सोहळा आणि जाहीर सभा होणार आहे. दरम्यान रोड शो दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाने विशेष सतर्कता घेऊन रोडशोमार्गाची पाहणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेत सुरक्षा व्यवस्था कार्यक्रमाचे रूपरेषा केली जात आहे. त्याचबरोबर नियोजनाचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारी कामाला लागले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाचे आणि पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी आज अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta