
बेळगाव : शहर उपनगरातील विविध ठिकाणच्या स्मार्ट सिटी कामांतर्गत झालेल्या चुकांचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागत आहे.अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनला गळती लागल्याचे प्रकार पाहायला मिळत आहेत. त्यातच उपनगर परिसरातील आदर्श नगर राम कॉलनी परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून सांडपाण्याची समस्या कायम असून, गेल्या पाच दिवसांपासून येथील ड्रेनेज चेंबर मधून सांडपाणी बाहेर पडून सार्वजनिक जागेत आणि घरात शिरत आहे. या संदर्भात महापालिकेला माहिती देण्यात आली आहे.मात्र पंतप्रधान दौऱ्याच्या कामात गुंतलेल्याचे कारण देत, महापालिका अधिकारी आपली जबाबदारी झटकण्याचे काम करत आहेत.
गेल्या पाच दिवसांपासून आदर्श नगर राम कॉलनी येथील सांडपाणी समस्याने गंभीर स्वरूप घेतले आहे. ड्रेनेज चेंबर तुंबून ड्रेनेजचे घाण पाणी सार्वजनिक जागेत, घरात शिरले आहे. या संदर्भात महापालिकेला कळविण्यात आले असता, महापालिकेचा आरोग्य आणि बांधकाम विभाग एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ड्रेनेज लाईन साफ करण्याचे प्रयत्न केले. मात्र ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे ही समस्या दूर झालेली नाही. या ठिकाणी काही अंतरापर्यंत ड्रेनेज लाईन नवी लाईन आवश्यक आहे असे मत आरोग्य विभागाने बांधकाम विभागाला कळविले आहे.
तेथील सांडपाण्याची समस्या दूर करण्यासाठी, बांधकाम विभागाने काही अंतरापर्यंतची ड्रेनेज पाईप लाईन बदलणे आवश्यक आहे. मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे राम कॉलनी येथील सांडपाण्याची समस्या बिकट बनली आहे. स्थानिक नागरिकांना मात्र प्रत्येक दिवशी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
घरात आणी आणि मोकळ्या जागेत शिरलेले पाणी यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका वाढला आहे. सांडपाण्यामुळे या भागात डासांचा उपद्रव वाढला आहे. मात्र त्याचे कोणतेही देणे घेणे महापालिकेला दिसत नाही. सांडपाण्याच्या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधीना माहिती देण्यात आली आहे. त्यांनीही या समस्येकडे काना कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. याबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta