Saturday , June 6 2026
Breaking News

निपाणी येथील शर्यतीत शिवानंद भोसलेंची घोडागाडी प्रथम महाशिवरात्रीनिमित्त आयोजन 

Spread the love
निपाणी (वार्ता) : महादेव गल्लीमधील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व स्पर्धा पार पडल्या. गुरुवारी (ता.२३) सायंकाळी आयोजित जनरल घोडागाडी शर्यतीमध्ये निपाणीच्या शिवानंद भोसले यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावून १५ रुपयांचे बक्षीस मिळविले.
या शर्यतीमध्ये यांच्या यमगरणीच्या रामचंद्र मोरे यांच्या गाडीने द्वितीय क्रमांकाचे १० हजार रुपये बक्षीस पटकाविले. तर कवठेपिरान येथील किंग राजक्या या जोडीच्या गाडीने तृतीय क्रमांक मिळवून ७ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले.
नवतर घोडा गाडी शर्यतीमध्ये विवेक आलासे -कुरुंदवाड, ओंकार केसरकर निपाणी, आणि अक्षय म्हाळुंगे- म्हाळुंगे यांच्या गाड्यांनी अनुक्रमे ७ हजार ५ हजार आणि ३ हजाराची  बक्षिसे पटकावली. एक्का घोडा गाडी शर्यतीमध्ये सदानंद घाटगे-निपाणी, शंकर भोसले आणि बबन खवरे -कोडणी यांच्या गाड्यांनी अनुक्रमे ३ हजार, २ हजार व १ हजार रुपयांची बक्षिसे पटकाविले.
शर्यतीचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण समारंभ श्रीमंत दादाराजे देसाई- निपाणकर सरकार, रोहित पाटील, अभियंते गजानन वसेदार, संजय कोठीवाले, सुकुमार गुरव, मलगोंडा पाटील व मान्यवरांच्या हस्ते झाला. यावेळी शिवा भोसले, प्रदीप इंगवले, तात्यासाहेब वालीकर, अजित सासणे, धोंडीबा केसरकर, प्रभाकर केसरकर, उदय घाटगे, सुरेश पाटील, सोमनाथ पाटील, मारुती केसरकर, सुरेश केंगारे, महेश बोधले, अजित पाटील, जयवंत पाटील यांच्यासह रयत संघटनेचे कार्यकर्ते आणि शर्यती शौकीन उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जोरदार पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशीही महामार्गावर आलेल्या पाण्यामुळे वाहतूक विस्कळीत

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी शहराजवळ असलेल्या तवंदी घाटात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *