Sunday , July 26 2026
Breaking News

उचगावात भव्य भारुडी भजन स्पर्धा

Spread the love

 

उचगाव : उचगाव येथील जागृत मळेकरणी देवीच्या वार्षिक सप्ताह उत्सवानिमित्त सोमवार दिनांक ६ मार्च २०२३ ते रविवार दिनांक १२ मार्च २०२३पर्यंत होणार असून या सप्ताह निमित्त यावर्षी “भारुडी भजन स्पर्धांचे” आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी एक लाख रुपयाची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तरी याचा भारूड भजन संघानी लाभ घ्यावा असे मळेकरणी सप्ताह उत्सव कमिटीने कळविले आहे.
होळी, शिमगा उत्सवात श्री. मळेकरणी देवी सप्ताह मोठ्या उत्साही वातावरणात दरवर्षी साजरा केला जातो. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे करमणुकीच्या कार्यक्रमांना ब्रेक लागला होता. मात्र यावर्षी पुन्हा या सप्ताह काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी या स्पर्धा कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या राज्यातील संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात. या स्पध्ये मध्ये एकूण तीन क्रमांक ठेवण्यात आलेले आहेत. पहिल्या क्रमांकासाठी ५१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३१ हजार रुपये, व तृतीय क्रमांकासाठी २१ हजार रुपये, अशी भव्य बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ज्या स्पर्धकांना या स्पर्धेत भाग घ्यावयाचा असेल त्यांनी २ मार्च २०२३ च्या आत मळेकरणी देवी सप्ताह उत्सव कमिटी अथवा एल. वाय. लाळगे (९९६४७४०१८६), शरद होनगेकर (७३४९१००५९०), महेश कुंडलकर (८४९४८३८०६५) क्रमांकाची संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *