Friday , March 6 2026
Breaking News

हलगा शिवारात गवताने भरलेल्या ट्रॅक्टरला आग

Spread the love

 

हलगा : हलगा शिवारात पिंजराने भरलेल्या ट्रॅक्टरला सर्विस वायरचा स्पर्श झाल्यामुळे ट्रॅक्टरमधील गवताला आग लागल्याची घटना रविवार दिनांक 26 रोजी घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी ट्रॅक्टर ट्रॉली मधील गवत पूर्णपणे जळले आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. बस्तवाड शेतवाडीतील वाळलेले गवत शिनोळी खुर्द येथील कृष्णा खांडेकर शेतकरी घेऊन जात होते. सायंकाळी चारच्या सुमारास हलगा गावाजवळ सदर ट्रॉलीतील गवत सर्वीस वायरला लागल्याने या ट्रॉलीतील गवता लागली, आगीने रुद्रावतार धारण केल्यामुळे परिसरातील शेतकरी जमा झाले व यातील इंजिनला बाहेर काढले गेले. तात्काळ शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर इंजिन बाहेर काढल्यामुळे कोणताही जीवित झाली नाही व चालक कृष्णा खांडेकर याला इंजिन काढतेवेळी आगीमुळे थोडी दुखापत झाली आहे. परंतु या आगीत ट्रॉलीतील संपूर्ण गावात व ट्रॉली, ट्रॉलीची चाके जळलेली आहेत. यामुळे या कृष्णा खांडेकर (शिनोळी खुर्द तालुका चंदगड) शेतकऱ्याचे सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. आग लागल्यामुळे ग्रामपंचायत अध्यक्ष सदानंद बेळगोजी यांनी अग्निशामक दलाला या घटनेची माहिती दिल्यामुळे लागलीच अग्निशमन दलाचे दोन मोटारी घटनास्थळी दाखल झाल्या व ही आग विझविण्यात आली. यावेळी हलगा येथील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कर्तव्य कठोर… पण मन माणुसकीने ओथंबलेले!

Spread the love  डी डी पी यू श्री एम एम कांबळे यांचे भावस्पर्शी छायाचित्र! बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *