बेळगाव : बेळगाव सीमा प्रश्नाबाबत मंगळवारी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या धरणे आंदोलनाच्या पूर्व संध्येला समितीचे युवा नेते आणि राष्ट्रवादी इंजिनियर्स सेल राज्य समन्वयक अमित देसाई यांनी महाराष्ट्र विधान सभेचे विरोधी गट नेते अजितदादा पवार आणि आमदार रोहित पवार यांची देवगिरी बंगल्यात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. आज आझाद मैदानावर होणाऱ्या धरणे आंदोलनात सहभागी होऊ असे आश्वासन अजित दादा पवार आणि आमदार रोहित पवार यांनी यावेळी दिले. अमित देसाई यांच्या सोबत विक्रांत होनगेकर, अजित नारळकर आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta