केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी
बेळगाव : नगरविकास प्राधिकरण कार्यालयात आज काँग्रेस पक्षाचे आमदार सतीश जारकीहोळी, आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर व अधिकार्यांची बैठक पार पडली. यावेळी बैठकीनंतर केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
आपापसातील मतभेदांमुळे आमदार अभय पाटील आणि आमदार अनिल बेनके यांनी बुडा अध्यक्षपदी नवीन व्यक्तीची निवड केली. कोणतीही पूर्व पूर्वसूचना न देता भाजपाच्या आमदारांनी हा निर्णय घेतला असून तो आम्हाला मान्य नाही. मात्र शहराच्या विकासासाठी आणि नगर विकास प्राधिकरणाला आमचे सहकार्य सदैव असेल असे यावेळी सांगितले.
गेल्या आठवड्यात भाजपा अधिकार्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत काही मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. याची माहिती आज झालेल्या बैठकीत देण्यात आल्याचे अधिकार्यांनी सांगितले. तसेच स्मार्ट सिटीचे निकृष्ट काम, पूरग्रस्तांसाठी घरे बांधणे, अधिकृत लेआउट बांधणे, घर बांधणे याबाबतही बैठकीत अधिकार्यांशी चर्चा करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta