बेळगाव : बेळगाव शहरात कचरा व्यवस्थापनाचे तीन तेरा वाजले असून महानगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. वॉर्ड क्र. 27 मध्ये कचरा उचल नियमित होत नाही. अवघ्या 100 मीटर अंतरावर ब्लॅक स्पॉट आहे त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत त्यामुळे त्या ठिकाणी कचरा टाकणे बंद झाले आहे. मात्र सफाई कामगार बसवेश्वर चौक खासबाग येथे कचरा डम्पिंग करत आहेत. त्यामुळे वॉर्ड क्र. 27 मधील बसवेश्वर चौक येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली असून डुकरांचा वावर वाढला आहे. येथून जवळच मरगम्मा देवीचे मंदिर आहे. मंदिर परिसरात हा कचरा उडून येत आहे त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डुकरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. वॉर्ड क्र.27 चे नगरसेवक रवी साळुंखे यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. तरी महानगरपालिकेने या भागातील कचरा उचल वेळेत करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta