बेळगाव : कर्नाटकी विधिमंडळ अधिवेशनविरोधात एकीकरण समितीने 2021 मध्ये महामेळावा आयोजित केल्याप्रकरणी म. ए. समितीच्या 29 जणांना टिळकवाडी पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यावर सोमवारी (दि. 13) सुनावणी होऊन सर्वांना जामीन मंजूर झाला.
कर्नाटक सरकारने 2021 मध्ये आयोजित केलेल्या विधिमंडळ अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा आयोजित केला होता. पण महापालिकेने या महामेळाव्याला विरोध करत टिळकवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. दीपक दळवी, प्रकाश मरगाळे, मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, आर. एम. चौगुले, मदन बामणे, नेताजी जाधव, रणजीत चव्हाण-पाटील, सरिता पाटील, रेणू किल्लेकर, शिवाजी सुंठकर, अनिल आमरोळे, पियूष हावळ आदींसह एकूण 29 जणांना समन्वय बजावलेला आहे. त्यावर आज चौथे जेएमएफसी न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत सर्व कार्यकर्त्यांना जामीन मंजूर झाला. समिती नेत्यांच्या वतीने अॅड. महेश बिर्जे, अॅड. एम. बी. बोंद्रे, अॅड. रिचमॅन रिकी, अॅड. बाळासाहेब कागणकर काम पाहात आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta