Monday , September 21 2026
Breaking News

तिलारी घाटात पडलेला टेम्पो काढताना क्रेन उलटून एक ठार

Spread the love

 

चंदगड : तिलारी घाटात पडलेला टेम्पो काढण्यासाठी आलेली क्रेन टेम्पो बाहेर काढत असताना ती दरीत कोसळून एक जण जागीच ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी उशिरा घडली. जावेद इब्राहिम अत्तार (रा. आझाद नगर, बेळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर अर्शफ कयामत अन्सारी अन्सारी असे जखमीचे नाव आहे.

तिलारी घाटात शनिवारी पडलेला बोलोरा पिकअप काढण्यासाठी रविवारी बेळगाव येथून क्रेन मागवली होती. पण बोलोरा पिकअप बाहेर काढत असताना क्रेनवरील ताबा सुटल्याने ती दरीत कोसळून एक जण ठार झाला. तरुणाच्या अपघाती निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

चंदगड पोलिस स्थानकात माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक हणमंत नाईक व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पण क्रेन दरीत पडली होती. त्यामुळे आत अडकलेल्या मृत व्यक्तीला अंधार पडल्याने बाहेर काढता आले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. सोमवारी दुपारी मृतदेह बाहेर काढला. तिलारी घाटात दिवसेंदिवस अपघात वाढत चालले आहेत. पण सुरक्षेसाठी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही. बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *