बेळगाव : बेळगाव येथील लेडी लायन्स ग्रुपच्या वतीने महिला दिनाच्या औचित्य साधून जगाचा पोशिंदा म्हणून लोकांचे पोट भरण्यासाठी शेतात आपले संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या कष्टकरी महिलांचा सत्कार करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्यात आला.
आनंदवाडीतील शेवंता पाटील, उर्मिला चव्हाण, सुभद्रा मास्तमर्डी, अनुसया पाटील, तुळसाबाई ढवळे, रंजना मुचंडी, सुंदराबाई पाटील, शांता कितुर या वयस्कर महिलांचा संस्थेच्या वतीने साडी श्रीफळ आणि पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
अपल्या शेतकरी नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून आपले संपूर्ण आयुष्य शेतकरी स्त्रिया वेचत असतात. अशा महिलांप्रति कृतज्ञता व त्यांच्या कष्टाचा गौरव व्हावा म्हणून लेडी लायन्स ग्रुपने हा अभिनव उपक्रम राबविला.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणुन शोभा गवी, कल्पना भांदुर्गे, लक्ष्मी मुचंडी या उपस्थित होत्या. या ग्रुपच्या संस्थापिका माधुरी जाधव पाटील यांनी उपस्थित महिलांचे आभार मानले.
यावेळी आनंदवाडीतील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधवी सुतार, सुजाता पाटील, सोनम पाटील, रूपा धोंगडी, रमा गंगने, उर्मिला अर्थशाली यांनी विशेष परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta