Tuesday , June 2 2026
Breaking News

लैला साखर कारखान्यावर अधिकाऱ्यांची धाड; भांड्यासह 25 किलो मटण जप्त

Spread the love

 

खानापूर : लैला शुगर कारखान्यात शेतकऱ्यांना मटणाची जेवणावळ देत असल्याची माहिती मिळताच खानापुरातील वेगवेगळ्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी धाड मारून तयार करण्यात आलेले 25 किलो मटण तसेच भांडी जप्त करण्यात आली व संबंधितावर गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी प्रसिद्धीसाठी दिली आहे,

आज दिनांक 19 मार्च 2023 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार खानापूर पारीश्वाड रस्त्याला लागून असलेल्या बल्लोगा गावाला लागून असलेल्या लैला शुगर कारखान्याच्या गोदामामध्ये लोकांना मांसाहारी जेवण देत असल्याची माहिती मिळाली असता त्या बातमीनुसार कार्यरत असलेले एफएसटी अधिकारी, AEE hescom, CDPO, BCM officer, व AD agriculture, व सब इन्स्पेक्टर तसेच उपनिरीक्षक व त्यांचे सहकारी तसेच तहसीलदार कार्यालयातील अधिकारी या सर्वानी मीळून तीन वाहनांमधून जाऊन लैला शुगर फॅक्टरीच्या गोडाऊनमध्ये पाहिले असता लोकांना जेवण देत असल्याचे दिसून आले असता
त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून घेण्यात आले व साखर कारखान्याचे एमडी सदानंद पाटील यांना बोलाविण्यात आले व जेटवणाबद्दल चौकशी केली असता त्यांनी सांगितले की कारखान्याला ऊस पाठविलेल्या शेतकऱ्यांना जेवण देत असल्याची कबूली दिली असता त्या ठिकाणी तयार केलेले 25 किलो मटण व भांडीसह साहित्य जप्त करून ताब्यात घेण्यात आले व त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील चौकशी खानापूर पोलीस करत आहेत असल्याची माहिती खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी प्रसिद्धीसाठी दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती म. ए. समिती जो आदेश देईल त्याला खानापूर तालुका म. ए. समितीचा पाठिंबा

Spread the love खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकडे समितीची बैठक खानापूर म. ए. समितीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *