बेळगाव : महात्मा गांधी वाचनालयचा तिसरा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरा करण्यात येणार आहे. या साहित्यिक कार्यक्रमाला मालोजीराव अष्टेकर (माजी महापौर) हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पहिल्या सत्रात निमंत्रित कवी आपल्या कविता सादर करणार आहेत. याचे सूत्रसंचालन प्रा. अशोक आलगोंडी हे करणार आहेत.
या बहारदार संमेलनात सहभागी… कवी शिवाजी शिंदे, निलेश शिंदे, मयुर नागेनट्टी, बाबुराव पाटील, कृष्णा पारवाडकर, सुधाकर गावडे, चंद्रशेखर गायकवाड, परशराम खेमणे, उर्मिला शहा, अमृता पवार, जोतिबा नागवडेकर, वाय. पी. नाईक, नामदेव मोरे, दशरथ सूर्यवंशी, विठ्ठल कदम सावंतवाडी, सहभागी होणार आहेत.
दुसऱ्या सत्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
आनंद चव्हाण नगरसेवक, मोहनराव मोरे, बी. एस. देवरमणी, निवृत्त शिक्षकांचा सत्कार, संतोष दरेकर, तसेच गावातील पहिल्या महिला कु. रेखा मोरे, इंजिनिअर झाल्याबद्दल, इ.सातवी, दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या, पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. आदर्श माता-पिता, यांचाही गौरव पत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, विद्यार्थ्यांचे नृत्य, गीत गायन, वेशभूषा, असे विविध कार्यक्रम यानिमित्ताने होणार आहेत. तरी साहित्यप्रेमीनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन वाय. पी. नाईक, मनोहर मोरे, पृथ्वी जाधव यांनी केले आहे.