Wednesday , March 4 2026
Breaking News

इच्छुक उमेदवारांसाठी समितीचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : येत्या 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव उत्तर व बेळगाव दक्षिण मतदार संघातून म. ए. समितीतर्फे निवडणूक लढविण्याऱ्या इच्छुकांनी देणगी व अनामत रक्कमेसह आपले अर्ज रामलिंगखिंड गल्ली, रंगूबाई पॅलेस येथील शहर म. ए. समितीच्या कार्यालयात दि. 4 ते 6 एप्रिलपर्यंत सकाळी 11 ते 1 व सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत आपले अर्ज शिवराज पाटील, अंकुश केसरकर व श्रीधर खन्नूकर यांच्याकडे सुपूर्द करावेत.
यावेळी इच्छुक उमेदवारांनी अर्जासोबत दोन आयडेटिटी साईज फोटो, मतदार यादीमध्ये नांव असलेली सर्टीफाईड, झेरॉक्स प्रत सादर करणे आवश्यक आहे, असे आवाहन अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *