Saturday , June 6 2026
Breaking News

खानापूर आम आदमीचा उमेदवार लवकरच जाहीर होणार : अध्यक्ष भैरू पाटील

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असुन येत्या १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा उमेदवारही खानापूर मतदार संघातून विधानसभा निवडणुकी लढविणार असल्याची माहिती खानापूर तालुका आम आदमीचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांनी बोलताना माहिती दिली.
सध्या कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. खानापूर तालुक्यातही विधान सभा निवडणुकीसाठी काँग्रेस व जेडीएस पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहे. केवळ भाजप पक्षाने व म. ए. समितीने आपला उमेदवार जाहीर केला नाही.
मात्र आता आम आदमी पक्षाचे खानापूर मतदार संघातून उमेदवाराचे लवकरच नाव जाहीर करण्यासाठी पक्षाच्या वरीष्ठ नेत्याशी संपर्क साधून बैठकीचे आयोजन करून नाव जाहिर होईल, असे मत खानापूर तालुका आम आदमीचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांनी प्रगट केले
यावेळी दशरथ बनोशी, उपाध्यक्ष लबीब शेख, सचिव शिवाजी गुंजीकर, शहर अध्यक्ष गोपाळ गुरव, मोहन मुळीक ओलमणी, मजुनाथ बागेवाडी खानापूर, रमेश कौंदलकर रूमेवाडीक्राॅस, कर्याप्पा बेकिनकेरी खानापूर, चंद्रकांत मेदार पारिश्वाड, मल्लिकार्जुन होसुर, दत्ता कदम मळव, महादेव दळवी, दयानंद पाटील, मनोहर पाटील, चैतन्य देसुरकर, बाबू शिंदे, राहुल गोरल,संभाजी पाटील, मोहीत नाईक, इमरान अत्तार, उदय कोडोळी, संजू पाटील आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. शिवाजी गुंजीकर यानी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

सुपीक जमिनींसाठी शेतकऱ्यांचा लढा तीव्र; रेल्वे प्रकल्पाविरोधात आक्षेप

Spread the love  बेळगाव : बेळगाव-धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहण प्रक्रियेला परिसरातील शेतकऱ्यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *