बेळगाव : घरच्या हलाखीच्या परिस्थितीत शहरातील एक माता आपल्या मुलाला जीवदान मिळावे यासाठी झटत आहे. त्यासाठी एक नव्हे तर दोन -दोन कामे करून राबत आहे. तिच्या मुलावर मुत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करायची असून त्यासाठी मोठा आर्थिक खर्च येणार असल्यामुळे मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
तानाजी गल्ली, होनगा येथील 32 वर्षीय भावक्काणा हुंदरे या इसमाचे मूत्रपिंड प्रत्यारोपण (किडनी ट्रान्सप्लांट) करायचे आहे. मात्र आर्थिक समस्या असल्याने हुंदरे कुटुंबियांना वेगवेगळ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. भावक्काणा यांची आई आपले मूत्रपिंड आपल्या मुलाला देण्यास तयार आहे. मात्र मूत्रपिंड देऊनही त्यांना उपचारासाठी 10 लाख रुपयांची गरज आहे. तसेच सध्या भावक्काणावर डायलेसिसचे उपचार सुरू आहेत. त्यामुळे आठवड्याला 7 हजार रुपये मोजावे लागत आहेत. या कठीण परिस्थितीत 10 लाखाचा डोंगर हुंदरे कुटुंबियाना उभा करायचा आहे. त्यामुळे त्यांनी समाजातील दानशूर व्यक्तींना मदत करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी पुढे दिलेल्या बँक तपशीलावर निधी जमा केल्यास हुंदरे कुटुंबियांना मोलाची मदत ठरणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा :काकती. आयएफएससी कोड : एसबीआयएन 0015454. एसी नं. : 33460938731. फोन पे : 9741262297. तसेच अधिक माहितीसाठी 9741262297 किंवा 8660305925 नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.