बेळगाव : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते ऍड. राजाभाऊ पाटील सरचिटणीस, ऍड. एम. जी. पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व पूजन करण्यात आले.
यावेळी ऍड. राजाभाऊ पाटील म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश लोकशाही पद्धतीने चालण्यासाठी भारताला स्वतःची राज्यघटना पाहिजे होती, ती राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून भारतामध्ये लोकशाही पद्धतीने राज चालवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. यामुळे ते भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत, त्यांच्या या कार्यामुळेच आज त्यांना भारतरत्न ही उपाधी देण्यात आली. या राज्यघटनेमुळेच आज जगामध्ये भारत लोकशाही पद्धतीने राज्य चालवत आहे. त्यांची जयंती करणे हे आम्हा सर्व भारतीयांचे कर्तव्यच आहे, असे विचार व्यक्त केले.
यावेळी आर एम चौगुले, सुधीर चव्हाण, सुनील अष्टेकर, रामचंद्र मोदगेकर, सुरेश राजूकर, अंकुश पाटील, शिवाजी अतिवाडकर, लक्ष्मन लाळगे, ऍड. श्याम पाटील, गुंडू गुंजीकर, डी. बी. पाटील, महादेव कंग्राळकर, निंगाप्पा मोरे, अनिल हेगडे, अशोक चौगुले, अनेक महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta