बेळगाव : महाराष्ट्र समितीचे गामीणचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांना मुतगा निलजी गावचा भरघोस पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावची ग्रामदेवता श्री भावकेश्वरी देवीचा आशीर्वाद घेण्यात आला. यावेळी सर्व ग्रामस्थ आर. एम. चौगुलेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना माजी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर म्हणाले की, महाराष्ट्र समिती आज मराठी संस्कृती आणि मराठी बाणा यासाठी गेली 66 वर्ष लढा देत असून आपली संस्कृती जपली पाहिजेत महाराष्ट्र समितीने अनेक लढे उभारलेत व ती शेतकऱ्यांची जमीन असो किंवा अनेक नागरी प्रश्न असो त्या सर्व प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट् समिती ही एकमेव समिती असो त्याच पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहिल्या पाहिजेत. आता समितीने युवा आणि ग्रामीण युवा नेतृत्व आर. एम. चौगुलेंची निवड केलेली असून सर्वांनी चौगुलेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आपण भरघोस मताने विजयी करूया असे आश्वासन देऊन मुतगा गावचा त्यांनी भरघोस पाठिंबा जाहीर केला.
यावेळी गावकऱ्यांनी आणि युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गाठीभेटी घेतल्या व भरघोस पाठिंबा जाहीर केला.
Belgaum Varta Belgaum Varta