Saturday , March 7 2026
Breaking News

नोडल अधिकाऱ्यांनी चेक पोस्टला भेट; वाहनांची तपासणी तीव्र करण्याचे निर्देश

Spread the love

 

बेळगाव : जिल्हा खर्च नियंत्रण नोडल अधिकारी परशुराम दुडगुंटी यांनी आज बेळगाव उत्तर मतदारसंघ आणि ग्रामीण मतदारसंघातील हिरेबागेवाडी, अरळीकट्टी, हत्तरगी आणि बाची या आंतरराज्य चेक पोस्टला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी मतदानाला चार दिवस शिल्लक असल्याने वाहनांची तपासणी अधिक तीव्र करण्याचे निर्देश त्यांनी चेकपोस्ट कर्मचाऱ्यांना दिले.

तपासणी प्रभावी करण्यासाठी अतिरिक्त तपासणी अधिकारी आणि पोलिसांची संख्या वाढवण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात येणार आअसल्याचे बी. दुडगुंटी म्हणाले.

मतदानाचा दिवस जसजसा जवळ येईल तसतसे अवैध पैसे व वस्तूंची तस्करी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बस, कार, दुचाकींचीही तपासणी करावी, अशी सूचनाही त्यांनी चेकपोस्ट कर्मचाऱ्यांना दिल्या.

यावेळी शीतल कुरणे व मंजुनाथ वेळागाईकर आदी सहाय्यक खर्च निरीक्षक, अधिकारी, पोलीस, निमलष्करी दलाचे कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

रयत गल्ली विहिरीत ड्रेनेज मिश्रित पाणी; जनतेचे आरोग्य धोक्यात

Spread the love  बेळगाव : ड्रेनेजचे सांडपाणी जमिनीत झिरपून रयत गल्ली, वडगाव येथील विहिरी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *