बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेस 11 तर भाजप 7 जागांवर आघाडीवर आहे.
अनेक मतदारसंघांचे निकाल यापूर्वीच जाहीर झाले असून काही मतांची मोजणी सुरू आहे. अथणी, बेळगाव ग्रामीण, बेळगाव उत्तर, सौंदत्ती, कित्तूर, रामदुर्ग, कागवाड, चिक्कोडी, यमकनमरडी, बैलहोंगल आणि कुडची येथे काँग्रेसचा विजय निश्चित आहे.
बेळगाव दक्षिण, खानापूर, गोकाक, अरभावी, हुक्केरी, निप्पाणी, रायबागमध्ये भाजपने बाजी मारली.
चिक्कोडीमध्ये गणेश हुक्केरी यांनी भाजपच्या रमेश कत्ती यांचा ७२ हजार मतांनी पराभव करत जिल्ह्यात सर्वाधिक विजयाची नोंद केली.
Belgaum Varta Belgaum Varta