बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक माननीय श्री. हरिभाऊ वझे यांचे दिनांक 13 रोजी दुःखद निधन झाले. ते 92 वर्षाचे होते. ते 1956 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक होते ते मूलतः बेळगावचेच होते. वयाच्या चौथ्या वर्षापासून ते संघाचे स्वयंसेवक होते. एम एस सी पदवी पूर्ण केल्यानंतर ते प्रचारक म्हणून निघाले. मंगळूर जिल्हा प्रचारक, म्हैसूर नगर प्रचारक, जिल्हा प्रचारक व विभाग प्रचारक म्हणून त्यांनी काम पाहिले. श्री हरिभाऊ त्यानंतर इतिहास संकलन समितीचे अखिल भारतीय संयोजक म्हणून सर्वांना मार्गदर्शन केले. सरस्वती नदीचा शोध करणाऱ्यांचा समूहाच्या ते सदस्य होते. श्री हरिभाऊ शारीरिक विषयात अग्रेसर होते. तसेच त्यांची बौद्धिक अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी होती. हरिभाऊ यांचे संपूर्ण जीवन राष्ट्र समर्पित झाले होते. हरिभाऊ यांचा पार्थिवाचा अंत्यसंस्कार आज दिनांक 13 मे रोजी रात्री 9 वाजता शहापूर स्मशाभूमीमध्ये अंतिमसंस्कार होईल. यात्रा गुड शेड रोडवरील संघ सदन या संघ कार्यालयातून निघणार आहे. याची सर्वांनी नोद घ्यावी.
Belgaum Varta Belgaum Varta