Sunday , July 26 2026
Breaking News

माजी नगरसेविकेचे घर जाळण्याचा प्रयत्न! ; पोलिसांत गुन्हा दाखल

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आल्यानंतर काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माजी नगरसेविका सुधा भातकांडे यांच्या घरावर दगड फेकून आणि घरात फटाके फोडले.
अभय पाटील यांची मिरवणूक निघाली असताना होसुर येथील सुधा भातकांडे यांच्या घरावर मिरवणुकीतील काही जणांनी दगडफेक करून सी सी टी व्ही कॅमेरा फोडला. तसेच त्यांच्या घरात फटाके फोडले. यामुळे सुधा भातकांडे यांच्या घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे. घरातील खुर्ची आणि अन्य साहित्याचे नुकसान झाले आहे. घटना घडल्यावर रमाकांत कोंडूसकर आणि भातकांडे यांनी शहापूर पोलीस स्थानकात जाऊन घडल्या घटनेबद्दल तक्रार नोंदवली आहे. नंतर पोलिसांनी तेथे भेट देऊन बंदोबस्त ठेवला.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *