Monday , December 8 2025
Breaking News

“पाकिस्तान झिंदाबाद”च्या घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाई करा : ऍड. एम. बी. जिरली

Spread the love

 

बेळगाव : विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच बेळगाव आरपीडी मतमोजणी केंद्राजवळ पाकिस्तान झिंदाबाद नारा देणाऱ्या बदमाशांवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते एम. बी. जिरली यांनी केली. भाजपचे प्रदेश प्रवक्ते एम. बी. जिरली यांनी शहरातील भाजप कार्यालयात बोलावलेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले की, काल मतमोजणीवेळी, शहरातील मतमोजणी केंद्रावर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. आम्ही भाजपच्या वतीने या प्रकारचा निषेध नोंदवतो. या प्रकारची चौकशी करून, घोषणाबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

ते म्हणाले की, काल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे. काँग्रेसने पूर्ण बहुमत मिळवले आहे. त्यामुळे आम्ही भाजप बेळगाव महानगर, जिल्हा, तसेच कर्नाटक राज्य भाजपच्या वतीने सर्व विजेत्या उमेदवारांचे अभिनंदन करतो. लोकशाही व्यवस्थेत जनादेशाचे महत्वपूर्ण स्थान आहे. आम्ही या जनादेशाचा आदर करून स्वीकार करतो. काँग्रेस सरकारला विकासाच्या दृष्टीने, मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सर्व सहकार्य करेल.
यावेळी त्यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस आणि भाजप आमदारांचे मी अभिनंदन केले . निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांची सेवा वाखाणण्याजोगी असल्याचे सांगून त्यांनी सर्व पत्रकारांचे देखील अभिनंदन केले.
बेळगाव जिल्ह्यातील भाजप उमेदवाराच्या पराभवाला सर्वच नेते जबाबदार आहेत. याबाबत आपण आत्मपरीक्षण करू, असे सांगून बेळगाव उत्तर मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे. भाजप नेत्यांनी आपला पराभव केल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला.
लोकसभा आणि राज्याच्या विधानसभा निवडणुका भाजपच्या पराभवाने ठरवता येणार नाहीत. राज्यातील निवडणुकीतील पराभव आम्ही स्वीकारला आहे. याबाबत राज्यस्तरावर आत्मपरीक्षण करण्यात येईल, असे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिले.

यावेळी बेळगाव शहर भाजप अध्यक्ष अनिल बेनके, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील, खासदार मंगला अंगडी, राजशेखर डोणी, सिद्धांगौडा पाटील, हनुमंत कोंगाली, शरद पाटील, जोरापूर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी नेताजी जाधव यांची निवड

Spread the love  सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड बेळगाव : १७७ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *