महानगरपालिकेने त्वरित उचल करावी
बेळगाव : गेल्या कित्येक महिन्यांपासून महानगरपालिकेने वॉर्ड क्रमांक 16 आनंदवाडी या परिसरातील कचऱ्याची उचल न केल्यामुळे परिसरातील भागात कचऱ्याचा ढीग मोठ्या प्रमाणात साठला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्याने गटारी भरून ड्रेनेजचे दूषित पाणी परिसरातील रंजना शेरेकर, मल्लेशी शेरेकर, सुंदराबाई पाटील, प्रभाकर पाटील, कृष्णा गवळी यांच्या घरात भरून तुंब झाले आहे. याचा आनंदवाडी भागातील नागरिकांना खूप त्रास होत आहे. तसेच वॉर्ड नंबर 15 मधील ड्रेनेज पाईपलाईन व्यवस्थित नसल्याने ड्रेनेज भरून येथील पाणी विहिरीमध्ये जाऊन पाणी दूषित होत आहे. याची दखल घेऊन महानगरपालिकेने त्वरित कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांनी तसेच समाजसेविका माधुरी जाधव यांनी केली आहे. याआधीही या भागातील कचरा न उचलल्याने याची तक्रार महानगरपालिकेकडे केली होती. याची दखल तात्पुरती घेतली होती. त्यानंतर पुन्हा कचऱ्याची उचल केली नाही. गल्लीतील समस्या लवकरात लवकर सोडवाव्या ही विनंती नागरिकांनी केली आहे. यावेळी संदीप कोकितकर, सुंदराबाई पाटील, शशिकांत रणदिवे, बाळू गुरव, मल्लेशी शेरेकर, अरुण कडोलकर, संदीप पाटील, अमृत ढवळे, साळुबाई ढवळे, प्रभावती अनगोळकर, रंजना शेरेकर, हे उपस्थित होते.