Monday , April 22 2024
Breaking News

साकव वाहुन गेल्याने गवाळी, कोंगळा, पास्टोली नागरिकांना नरक यातना

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : येण्याजाण्याचा आधार म्हादई नदीवर असलेले लोखंडी साकव मुसळधार पावसामुळे वाहुन गेल्याने गवाळी, पास्टोली, कोंगळा नागरिकांना आता नरक यातना सहन कराव्या लागणार आहे. याबाबतची हकीकत अशी की, खानापूर तालुक्यातील नेरसा गवाळी मार्गावरील म्हादई नदीवरील साकव तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गुरूवारी वाहुन गेला.
नेरसा, गवाळी मार्गावरील म्हादई नदीवर लोंखडी साकव बांधण्यात आला होता. त्यामुळे कोंगळा, गवाळी, पास्टोली आदी गावाचा नेरसे गावाशी संपर्क होत होता.
मात्र तालुक्यात गेल्या चार दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातल्याने म्हादई नदीवरचा लोखंडी साकव वाहुन गेला त्यामुळे या गावाना बेटाचे स्वरूप आले.
खानापूर तालुक्यापासून जवळपास २८ किलोमीटर अंतरावर गवाळी, पास्टोली, कोंगळा गावे आहेत. या गावाना जोडणाऱ्या भांडूरा नाला व म्हादई नदीवर गेल्या तीन चार वर्षापूर्वी निजदचे नेते नासीर बागवान यांनी लोंखडी साकव तयार केले होते. गुरूवारी या गावचे नागरिक कोरोना लस घेण्यासाठी अशोकनगर प्राथमिक आरोग्य केंद्राला जाऊन लस घेऊन आले. त्यानंतर काही काळातच तो लोखंडी साकव म्हादई नदीला पाणी आल्याने वाहुन गेला.
आता भर पावसाळ्यात नदीचे पाणी कमी होईतोपर्यत या गावच्या नागरिकांना संपर्क करणे कठीण आहे. आता हे नागरिक पुन्हा पुलाच्या प्रतिक्षेत आहेत.
या ठिकाणी म्हादई नदीवर सरकारने लोंखडी पुल मंजूर केले आहे. मात्र वनखात्याचा विरोध होत असल्याने हे काम रेंगाळले आहे.
आता या भागातील नागरिक पुन्हा साकवाच्या प्रतिक्षेत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

मराठा समाजाने राजकारण बाजूला ठेवून डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे

Spread the love  खानापूर : सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन मराठा समाजाचा खासदार दिल्लीत पाठवा. मागील 30 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *