बेळगाव : 1 जून 1986 साली कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात झालेल्या हुतात्मा अभिवादन करण्यासाठी उद्या गुरुवार दि. 1 जून रोजी सकाळी ठीक साडेआठ वाजता हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे अभिवादन करण्यात येणार आहे.
प्रति वर्षाप्रमाणे सीमाभागातील मराठी बांधव 1 जून रोजी या हुतात्मा अभिवादन गांभीर्याने पाळतात, यावर्षीही 1 जून रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या 66 वर्षापासून सीमाभागातील मराठी भाषिक कर्नाटकाच्या जोखंडात आखडून पडला आहे, तो आपल्या माय मराठी महाराष्ट्र राज्यात जाण्याकरता लोकशाही मार्गाने जो लढा चालू आहे, त्या लढ्यातील एक भाग म्हणून 1 जून 1986 रोजी कन्नड सक्ती विरोधी आंदोलन झाले होते. त्यामध्ये बेळगाव परिसरातील हुतात्मे झाले होते. त्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षी आयोजित करण्यात आला आहे. तरी या हुतात्माना अभिवादन करण्यासाठी सीमा भागातील समस्त मराठी भाषिकांनी, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta