Friday , November 22 2024
Breaking News

जिव्हाळा फाऊंडेशनच्यावतीने महामार्गावर ट्रक चालकांना अन्नाची पाकिटे, पाणी आणि केळ्यांचे वाटप

Spread the love

बेळगाव : बेळगाव परिसरात मुसळधार पावसामुळे शेकडो ट्रक आणि ट्रक चालक महामार्गावर अडकले आहेत. त्यांना जेवण आणि पिण्यासाठी पाणीसुद्धा मिळत नव्हते याची माहिती जिव्हाळा फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना समजली. लागलीच अध्यक्षा डॉ. सुरेखा पोटे, डॉ. सविता कद्दु, डॉ. राजश्री अनगोळ, आरती निप्पाणीकर, शाहबाज जमादार, वृषभ अवलक्की, योगिता पाटील, श्रीनिवास गुडमट्टी यांनी रात्री आठ वाजता काकती पासून ते हत्तरगी पर्यंत थांबून असणाऱ्या ट्रकच्या चालकांना आणि महामार्ग व्यवस्थापन यंत्रणेच्या कर्मचार्‍यांना 250 खाद्य पॅकेट पाण्याच्या बाटल्या, केळी आणि बिस्किटाची पाकिटे उपलब्ध करुन दिली.
ट्रक चालक आणि इतर गरजूंना रात्रीच्या वेळी जेवण, पाणी उपलब्ध झाल्यामुळे त्यांनी जिव्हाळा फाऊंडेशनचे आभार मानले.
या उपक्रमासाठी डॉ. रवींद्र अनगोळ, डॉ. सुरेखा पोटे, डॉ. केतकी पाऊसकर, डॉ. मरिअम टेबला, आरती निपाणीकर, गीतांजली रेडकर यांचे सहकार्य लाभले.

About Belgaum Varta

Check Also

भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना

Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *