Tuesday , March 3 2026
Breaking News

विद्यार्थ्यांना लवकरच अंडी, चिक्की आणि केळीचे वाटप होणार

Spread the love

 

बेळगाव : विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा यासाठी अंडी, शेंगदाणा चिक्की व केळी यांचे वाटप केले जाते. शाळा सुरू होऊन पंधरा दिवस झाले तरी अद्याप अंडी, केळी व चिक्कीचे वाटप करण्यात आले नव्हते. अखेर शिक्षण विभागाला याची जाणीव झाली असून अंडी, केळी व चिक्की वितरण सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रधानमंत्री पोषण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना सकस आहार पुरविला जातो. दुपारच्या जेवणासोबत विद्यार्थ्यांना पोषक जीवनसत्वे मिळावीत यासाठी अंडी व चिक्की वितरण केली जाते. राज्यात मागील वर्षापासून आठवड्यातून एकदा विद्यार्थ्यांना अंडी वितरण सुरू करण्यात आले. जे विद्यार्थी शाकाहारी आहेत त्यांना अंड्याऐवजी शेंगदाणा चिक्की किंवा केळी दिली जातात. विद्यार्थ्यांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने याचे वाटप सुरू करण्यात आले.
मे महिन्याच्या अखेरीला या वर्षाच्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ झाला. शाळा सुरू होऊन २० दिवस होत आले तरी चिक्की, केळी व अंड्यांचे वाटप करण्यात आले नव्हते. यासंदर्भात काहींनी सरकारकडे तक्रारही केली. याची दखल घेत सार्वजनिक शिक्षण विभागाने मंगळवार दि. २० जून रोजी चिक्की व अंडी वितरणाचा अध्यादेश काढला आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना अध्यादेश पाठविण्यात आला असून लवकरच चिक्की, केळी व अंड्यांचे वाटप सुरू करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. शाळेचे मुख्याध्यापक व एसडीएमसी कमिटीच्या देखरेखीखाली विद्यार्थ्यांना आहाराचे वाटप करावे. पहिली ते आठवीपर्यंतच्या सरकारी व अनुदानित शाळांमध्ये आहाराचे वाटप करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जिल्हा पंचायत व तालुका पंचायतीच्या अधिकाऱ्यांनाही सूचना करण्यात आल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

श्री चांगळेश्वरी हायस्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Spread the love  बेळगाव : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित श्री चांगळेश्वरी हायस्कूल या ठिकाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *