Monday , September 21 2026
Breaking News

चव्हाट गल्लीतील रहिवाशांचे पावसासाठी वरुणराजाला साकडे

Spread the love

 

बेळगाव : बेळगावातील चव्हाट गल्लीतील रहिवाशांनी वरुणराजाला साकडे घातले आहे. लक्ष्मी टेकडीवर पूजा-अर्चा करून वरुणराजाला साकडे घालण्यात आले. पावसासाठी मंगळवारी दुपारी चार वाजता चव्हाट गल्लीतील रहिवाशांच्याकडून वरुणराजाला साकडे घालण्यात आले. जून महिना कोरडा गेल्याने सीमाभागात चिंतेचे ढग निर्माण झाले असून शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. काही वर्षांपूर्वी रोहिणी आणि मृग नक्षत्रात सरासरी पर्जन्य वृष्टी होत असल्याने या दिवसांत मशागत पूर्ण होऊन पेरणीची तयारी सुरु होत होती. तथापी, यंदा रोहिणी आणि मृग दोन्ही नक्षत्रांनी वाकुल्या दाखवल्याने मशागतही लांबली आणि पेरण्याही खोळंबल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.जुन महिना संपत आला तरी सीमाभागातील, शेतकरी अजूनही पावसाची वाट पहात आहे. सीमाभागात धोधो पाऊस पडू दे, बळीराजाला सुखा-समाधानाचे दिवस येवू दे, धनधान्याने घर भरू दे तसेच शेतमालाला दर मिळून शेतकरी राजा समाधानाने जगू दे” असे साकडे चव्हाट गल्लीतील ज्योतिर्लिंग देवदादा सासणकाठीच्या भक्तांनी व गल्लीतील नागरिकांकडून मंगळवारी सायंकाळी 4 वाजता लक्ष्मी टेकडी येथील श्री लक्ष्मी मंदिरात पूजा व आरती करून पावसासाठी वरूणराजाला साकडे घालण्यात आले. यावेळी चव्हाट गल्लीतील पंच प्रताप मोहिते यांनी विधिपूर्वक पूजन करून अकरा कुमारिकांची ओटी भरून वरुणराजाला साकडे घालण्यात आले. यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी लक्ष्मण किल्लेकर, उत्तम नाकाडी, लक्ष्मण नाईक, सुनील जाधव, अमर यळूरकर, दिंगबर पवार, भाऊ नाईक, प्रवीण धामणेकर, चंद्रकांत कणबरकर, अनंत बामणे, बाबू मोहिते, किसन रेडेकर, प्रवीण जाधव, श्रीनाथ पवार, संदीप मोहिते, विश्वास धुराजी, गिरीश पाटील यासह गल्लीतील महिला व नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *