
बेळगाव : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रियकरासह त्याच्या मित्रांच्या सहाय्याने खून केल्याची घटना बेळगावात घडली असून, आता 4 आरोपींना एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे.
मृतक रमेश कांबळे (वय 38, रा. आंबेडकरनगर) हे व्यवसायाने पेंटर असून 28 मार्च रोजी बेळगाव येथून अचानक बेपत्ता झाले होते. त्यांच्या पत्नीने (संध्या) एपीएमसी पोलिस ठाण्यात 5 जून रोजी तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता सत्य समोर आले. बाळू बिरंजे याचे रमेशच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. पत्नी संध्याने तपास सुरू करणाऱ्या पोलिसांना सांगितले की, तिचा पती एका महिलेसोबत पळून गेला होता. त्यानंतर पोलिसांना या घटनेचा संशय आला आणि त्यांनी रमेशची पत्नी संध्या आणि रमेशच्या मित्रांची चौकशी केली. रमेशची पत्नी आणि मित्रांनी ही हत्या आपणच केल्याची कबुली दिली आहे. रमेशची पत्नी संध्या आणि बाळू बिरंजे यांचे अनैतिक संबंध होते आणि तिने प्रियकर बाळूसोबत पती रमेशची हत्या केल्याची कबुली दिली.
मृतदेह गोव्यातील चोर्ला घाटात
आरोपी पत्नीनेही कबूल केले की तिने प्रियकर बाळूसोबत त्याच्या मित्रांच्या सहाय्याने हत्या करून मृतदेह गोव्यातील चोर्ला घाटात फेकून दिला. रमेशला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि नंतर गळा आवळून खून केल्याचे चौकशीदरम्यान सांगण्यात आले. बेळगावच्या एपीएमसी पोलिसांनी याप्रकरणी 4 आरोपींना अटक केली असून रमेशच्या मृतदेहाचा शोध सुरू केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta