Friday , November 22 2024
Breaking News

बेळगावात बकरी ईद सण मोठ्या उत्साहात, शांततेत

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरात तसेच जिल्हाभरात मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला. शेकडो मुस्लिमबांधवानी इद -उल -अजाचे नमाज पठण करून जगाचे कल्याण आणि पावसासाठी प्रार्थना केली.
मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा एक महत्वाचा सण आहे. या दिवशी या ईदचे नमाज पठण करून मुस्लिम बांधव पशूंची कुर्बानी देतात. आजच्या दिवशी शहर तसेच आसपासच्या भागातील मुस्लिम बांधव बेळगावच्या ईदगाह मैदानावर तसेच स्थानिक मशिदींमध्ये इद -उल -अजा चे नमाजपठण केले. अब्दुल रझाक मोमीन, सिराज अश्रफी यांनी नमाजपठण केले यानंतर मुफ्ती अब्दुल अझीझ काझी, मुफ्ती जुहेर अहमद काझी, मुफ्ती मंजूर आलम यांनी बकरी ईद सणाचे महत्व सांगितले. तसेच आम्ही जी निसर्गाची, पर्यावरणाची हानी करीत आहोत त्यामुळे निसर्गचक्र बिघडून सर्व पर्यावरणीय बदल घडत आहे आणि याचा परिणाम मानवजातीसह सर्व चराचराला भोगावा लागत आहे. त्यामुळे विश्वशांती, समता, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता आणि सुरक्षा तसेच पावसासाठी सामुदायिक प्रार्थना केली.
त्यानंतर मुस्लिमबांधवानी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना आ. आसिफ उर्फ राजू सेठ यांनी सर्वाना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, बेळगाव शहरातच नाही तर पूर्ण देशभरात ईद साजरी केली जात आहे. सर्वानी आनंदाने ईद साजरी करा. आपापसात बंधूभाव, प्रेम कायम राखा. सर्वानी मिळून मिसळून रहा असे ते म्हणाले.
माजी आ. फिरोज सेठ यांनी देखील सर्वाना ईदच्या शुभेच्छा दिल्या. जे काही आपले रीतिरिवाज आहेत ते कायदयाच्या चौकटीत राहून पाळा. आपल्या एखाद्या गोष्टीमुळे कोणाचे मन दुखावणार नाही असे आपल्याला वागायचे आहे. इतरानी देखील आम्ही दुखावणार नाही ते वागावे, तरच खऱ्या अर्थाने देशाची प्रगती होईल आणि याच्याशी आमच्या सर्वांच्या मुलांचे भविष्य जोडले गेले आहे असे म्हणून त्यांनी सर्वाना पुन्हा एकदा ईदच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बेळगाव उत्तरच्या आमदारपदी निवडून आलेल्या आसिफ उर्फ राजू सेठ यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
एकंदर बेळगाव शहरात बकरी ईद सण मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला.

About Belgaum Varta

Check Also

भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना

Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *