मच्छे : बेळगाव खानापूर महामार्गावरील ब्रह्मनगर मारुती मंदिर समोर बेकायदेशीर रेशनचा तांदूळ वाहतूक करणारा ट्रक उद्यमबाग पोलिसांनी अंदाजे 1 लाख 80 हजार किमतीचा तांदूळ जप्त केला.
मच्छे, पिरनवाडी, खादरवाडी, हुंचेनट्टी, देसुर परिसरातील सरकारमान्य रेशन दुकानातून गोरगरिबांना मिळणारा स्वस्त तांदूळ पिरनवाडी येथील मुजावर नामक व्यक्ती गल्लोगल्ली जाऊन आपल्या रिक्षा मधून तांदूळ जमा करून तो तांदूळ एक ट्रक मधून बेळगाव गांधीनगर येथे जमा करण्यात येत होता ही माहिती अन्य पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांना समजली. त्यांनी उद्यमबाग पोलिसांचे सहकार्य घेऊन शुक्रवार दिनांक ३० रोजी
बेळगाव खानापूर महामार्गावरील ब्रह्मनगर मारुती मंदिर नजीक सापळा रचून पिरनवाडी इथून येणारा ट्रक अडविला. या ट्रकची तपासणी केली असता या ट्रकमध्ये सुमारे 50 क्विंटल तांदूळ रेशनचा असल्याची अजून आले. याप्रकरणी पिरनवाडी येथील मुजावर नामक व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून चौकशी केली असता आपण प्रत्येक गावात जाऊन रेशनचा तांदूळ कमी दरात विकत घेतो यानंतर हा तांदूळ जमा करून बेळगाव गांधीनगर येथे एका व्यक्तीच्या घरी जमा करून हा तांदूळ आम्ही गुजरातमध्ये पाठवतो, अशी माहिती त्यांनी दिली.
याबद्दल अधिक पुढील तपास पोलीस व अन्नपुरवठा खात्याचे अधिकारी करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta