बेळगाव : कर्नाटक कार्यकारी पत्रकार संघ, जिल्हा शाखा बेळगाव व माहिती व प्रसार खात्याच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार दिन व पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केएलई संस्थेच्या जिरगे सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार असून हा कार्यक्रम हुक्केरी मठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींच्या सानिध्यात होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष डॉ. भीमशी जारकीहोळी हे असणार आहेत. याचबरोबर राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माहिती व प्रसारण खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबुर, संघाचे बेंगळूर राज्य उपाध्यक्ष पुंडलिक बालोजी, बेळगाव जिल्हाध्यक्ष दिलीप कुरुंदवडे हे उपस्थित असणार असल्याचे एका पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta