
अथणी : कृष्णा नदीच्या पात्रातून बेकायदा वाळू उत्खनन करणाऱ्यांवर पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र नायकोडी यांनी छापा टाकला. या छाप्यात 4 जेसीबी, 25 ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केल्या.
अवैध वाळूचा उपसा झाल्याने नद्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. त्याच बरोबर पूर परिस्थिती निर्माण होण्यासाठी या गोष्टी कारणीभूत ठरत आहेत. बेळगाव जिल्ह्यात कृष्णा नदी परिसर चिकोडी, अथणी तालुका व्यतिरिक्त खानापूर मलप्रभा नदी, गोकाक घटप्रभा नदीवर मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत होती मात्र पोलिसांनी त्यावर अंकुश आणण्यात बऱ्यापैकी यश मिळवले आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या या मंडळींवर चाप बसवणे निश्चित गरजेचे होते. अश्यावेळी पोलीस अधीक्षक संजीव पाटील यांनी मोठी कारवाई वाळू माफियांवर केली आहे ही बाब कौतुकास्पद मानली जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta