बेळगाव : मराठा मंडळ संचलित बस्तवाड हायस्कूल येथे कै. सुवर्णाताई मोदगेकर स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा पंचायत सदस्य आणि मराठा मंडळ विश्वस्त कमिटीचे उपाध्यक्ष रामचंद्र मोदकेकर हे होते.
विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर कैलासवासी सुवर्णाताई मोदगेकर फोटो पूजन नगरसेवक शिवाजी मंडोळकर, ग्रामपंचायत सदस्य रामा काकतकर यांच्या हस्ते करण्यात आले. एसडीएमसी अध्यक्ष शिवाजी काकतकर, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर मनोहर बांडगी, मुख्याध्यापक एस जी कदम, एस. बी. चीगरे, प्रकाश देसाई आणि किरण मोदगेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
मुख्याध्यापक विजय खांडेकर यांनी प्रास्ताविक आणि उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित मान्यवरांची समायोजित भाषणे झाली. या कार्यक्रमाच्या औचित्याने कोंडुसकोप सरकारी शाळेतील तसेच बस्तवाड सरकारी मराठी शाळेतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना तसेच हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बी. बी. पाटील यांनी तर आभार व्ही. बी लोहार यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta