चेअरमनपदी रमाकांत पावशे व व्हा. चेअरमनपदी जयश्री पावशे यांची निवड
बेळगाव : हिंडलगा येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक दि. 2 रोजी होणार होती. इच्छूक सभासदांनी अर्ज भरले होते. यामध्ये महिलावर्गात जयश्री र. पावशे, पार्वती वि. कोकितकर व भागाण्णा नरोटी, धर्मेंद्र रा. खातेदार, आण्णाप्पा सि. नाईक यांची राखीवमध्ये अविरोध निवड झाली. परंतु कर्जदार व बिन कर्जदार व बी गटात उमेदवारी अर्जामुळे निवडणूक होण्याची
चिन्हे दिसत होती. यामुळे हिंडलगा, सुळगा, आंबेवाडी व मण्णूर गावचे लक्ष लागले होते. परंतु राजू य. कुपेकर यांनी संस्थेच्या निवडणूकीमुळे संस्थेचे आर्थिक नुकसान होवू नये यासाठी माघार घेऊन आदर्श निर्माण केला. याच अनुषंगाने माजी संचालक सुरेश के. अगसगेकर, मोहन एम. नाईक, विलास जा. नाईक, अशोक वाय. पाटील, महादेव एम. राक्षे व उमेदवारी अर्ज दाखल केलेले रमेश के. अगसगेकर, यल्लाप्पा जी. काकतकर यांनी नवीन उमेदवारांसाठी माघार घेतली व संघाच्या हितासाठी आदर्श घालून सभासदांकडून प्रशंसा मिळविली.
यावेळी नुतन संचालक म्हणून निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश जी. बेळगुंदकर, प्रकाश मो. पाटील, प्रकाश ना. कडोलकर, परशराम निं. जगताप, मृणाल आर. हेब्बाळकर, बाळू बी. तरळे
यांची निवड झाली. या संस्थेच्या अविरोध निवडीमुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे. निवडणूक अधिकारी एस. जी. पाटील यानी कामकाज पाहिले. संस्थेचे व्यवस्थापक उत्तम शिंदे व कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.
दि. 9 रोजी चेअरमन व व्हा. चेअरमन यांची अविरोध निवड झाली. सलग पाचव्यांदा रमाकांत या. पावशे व दुसर्यांदा जयश्री र. पावशे यांची अभिनंदनीय निवड झाली. यावेळी संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ व पुष्पमाल घालून सत्कार करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta