Sunday , December 14 2025
Breaking News

‘सुवर्णलक्ष्मी’ची वार्षिक सभा खेळीमेळीत

Spread the love

बेळगाव : श्री सुवर्णलक्ष्मी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., बेळगाव या संस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. ३० नोव्हेंबर रोजी संस्थेच्या गणेशपूर गल्ली शहापूर शाखा येथे नुकतीच झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष विजय सांबरेकर होते व प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सभासदन रविंद्र टोपाजिचे हे होते. संस्थेचे संस्थापक मोहन कारेकर व्यासपीठावर उपस्थित होते. सचिव अभय हळदणकर यांनी सर्वांचे स्वागत केले.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष विजय सांबरेकर यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर सभेच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अभय हळदणकर यांनी मागील वर्षाचा सभेचा वृत्तांत वाचून मंजूरी घेतली. संस्थेचे अकौंटंट प्रदीप किल्लेकर यांनी नफा तोटा पत्रक व ताळेबंद पत्रकाचे वाचन करुन मंजूरी घेतली व पुढील वर्षासाठी अंदाजपत्रक सादर केले व नफा विभागणी वाचन करुन मंजूरी घेण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विजय सांबरेकर यांनी मागील वर्षाचा आढावा घेतला व संस्थेने सर्वांगिण विकासासाठी प्रगती करत यावर्षी ३६ लाख रुपये १८ हजार ६९१ इतका नफा मिळविला असून सभासदांना १७ टक्के लाभांश देणार असल्याचे जाहीर केले. तसेच संस्थेचे जे ब्रिद वाक्य आहे ‘विश्‍वासू सोसायटी विश्‍वासू माणसे’ हे संस्थेचे कार्यकारी मंडळ सतत आपल्या डोळ्यासमोर ठेवून कोणताही निर्णय घेत असतात असे ते म्हणाले. त्यानंतर प्रमुख पाहुणे रविंद्र टोपाजिचे यांनी संस्थेच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे संस्थापक मोहन कारेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, सभासदांनी आपल्या संस्थेशी अधिकाधिक व्यवहार करावा असे आवाहन केले. त्यानंतर संस्थेच्या पुढील वाटचालीचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सभासद व जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्या माजी अध्यक्षा नम्रता महांगावकर यांनी हिरकणी ग्रुपतर्फे नवरात्रो उत्सवामध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी दिवंगत संचालक, संचालिका व सभासदांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी संचालक विनायक कारेकर, दिपक शिरोडकर, प्रकाश वेर्णेकर, राजू बांदीवडेकर, माणिक सांबरेकर, विराज सांबरेकर, शितल शिरोडकर, मधुरा शिरोडकर, अजित भोसले, समर्थ कारेकर, सिदुराई हुंदरे, शुभकांत कलघटगी, रोहन सांबरेकर, प्रदीप कारेकर, जयश्री धुडूम इतर अनेक सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन अभय हळदणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रदीप किल्लेकर यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

युवा समितीच्या वतीने आयोजित सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वी करण्याचा बैठकीत निर्धार

Spread the love  महामेळाव्याला आडकाठी आणणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *