
बेळगाव : आनंदनगर, दुसरा क्रॉस येथील छत्रपती शिवाजी युवक मंडळच्यावतीने श्रमदानातून खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करण्याबरोबरच सार्वजनिक बोअरची मोटर सुद्धा दुरुस्त करण्यात आल्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.
सध्याच्या पावसाळ्यामध्ये वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सोयीचे व्हावे यासाठी प्रशासनावर विसंबून न राहता छ. शिवाजी युवक मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वतःच श्रमदानाने रस्त्याची दुरुस्ती केली. त्यांनी खडी व चिपिंग टाकून रस्त्यावरील खड्डे बुजविले. जनहिताच्या या उपक्रमात मंडळाचे अध्यक्ष मनोज पवार, मल्लाप्पा कुंडेकर, बाळू तुमचे, महेश सुभेदार, संतोष पवार, चंद्रकांत धुडुम, नारायण नायकोजी, शंकर नंदी, अशोक कुपसद, बाळासाहेब पाटील व अंबरीस चव्हाण यांचा सहभाग होता. या सर्वांची चहापानाची व्यवस्था करून बाळासाहेब पाटील यांनी त्यांना धन्यवाद दिले. छ. शिवाजी युवक मंडळाच्या या कार्याची आनंदनगर, दुसरा क्रॉस येथील नागरिकांमध्ये प्रशंसा होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta