बेळगाव : रात्रंदिवस जनतेची सेवा करणाऱ्या पोलिसांचे आरोग्य सुरक्षित रहावे त्यांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचे आजार उद्भवू नये याकरिता एंजल फाउंडेशनच्या वतीने डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधात्मक देण्यात आली.
येथील माळ मारुती पोलीस संघातील सर्व पोलीस कर्मचारी रात्रंदिवस जनतेप्रति आपली सेवा बजावीत असतात तसेच पावसाळ्यात अहोरात्र काम करत असतात. त्यांना कुठेही आणि कधीही कोणत्याही वेळे थांबावे लागते त्यामुळे डासांपासून उद्भवणारे आजार त्यांना होऊ नये. तसेच त्याना कोणताही आरोग्य विषयक समस्येला तोंड द्यावे लागू नये याकरिता एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा मीनाताई बेनके यांच्या मार्गदर्शाखाली शशिकला जोशी, किरण, विजय यांनी पोलीस स्थानकातील सर्व पोलिसांना डेंग्यू चिकनगुनिया प्रतिबंधात्मक लस दिली.
Belgaum Varta Belgaum Varta