बेळगाव: किल्ला तलावात बुडणाऱ्या महिलेला वाचवणाऱ्या बेळगावच्या ट्रॅफिक पोलीसाच्या नावाची मुख्यमंत्री पुरस्कारासाठी शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ट्रॅफिक पोलिस काशिनाथ इरगर यांनी शनिवारी किल्ला तलावात बुडणाऱ्या महिलेला वाचवले. महिलेला पाण्यात बुडताना पाहून काशिनाथने तातडीने पाण्यात उडी मारून तिला वाचवले. तलावात बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचवणाऱ्या ट्रॅफिक पोलीस काशिनाथ इरगर यांनी दाखवलेल्या कार्यतत्परचे कौतुक करून पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा म्हणाले की, त्यांच्याकडून ५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले असून या धाडसी जवानाची मुख्यमंत्री पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येईल.
Belgaum Varta Belgaum Varta