बेळगाव : हर घर तिरंगा अभियान सुरू करण्यात आले. 13 ते 15 असे तीन दिवस जिल्ह्यातील घरोघरी राष्ट्रध्वज फडकवून सर्वांच्या मनात देशभक्ती रुजविणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यभरात हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. मोहीम यशस्वी करण्यासाठी जनतेनेही स्वेच्छेने सहभागी होऊन आपापल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा. ध्वजाचा शिष्टाचार पाळावा आणि राष्ट्रध्वज फडकवावा, अशी विनंती त्यांनी केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यात एकूण 35 हजार राष्ट्रध्वजांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायती, नगरपालिका, नगर पंचायत आणि महानगरपालिका कार्यालयात राष्ट्रध्वज जनतेसाठी उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.
प्रत्येक राष्ट्रध्वजासाठी 25.50 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. या अभियानात सर्वांनी सहभागी होऊन यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta