Sunday , July 26 2026
Breaking News

शहराच्या मध्यवर्ती भागात धाडसी चोरी; 14 लाखाचा मुद्देमाल लंपास

Spread the love

 

बेळगाव : बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी 24 तोळे सोन्याचे दागिने आणि 1 लाख 30 हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे 14 लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना काल शुक्रवारी मध्यरात्री शहराच्या मध्यवर्ती असलेल्या गोंधळी गल्ली येथे घडली आहे. शहरात झालेल्या धाडसी घरफोडीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोंधळी गल्ली येथील चेतन कुरणे हे घर बंद करून परगावी गेले होते. शुक्रवारी मध्यरात्री सर्वत्र सामसूम होताच घराचे कडीकुलुप तोडून चोरट्यानी आत प्रवेश केला व घरातील 24 तोळे सोने व 1 लाख 30 हजार रोख रक्कम लंपास केली. कुटुंबासमवेत परगावी गेलेले चेतन कुरणे आज शनिवारी सकाळी आपल्या घरी परतले असता चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. तेव्हा त्यांनी लागलीच पोलिसांना माहिती देऊन तक्रार नोंदविली आहे.
खडेबाजार पोलिसांना चोरीची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप निंबाळकर तसेच अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वान पथक गोंधळी गल्ली गवळी गल्ली परिसरात घुटमळून परत आले. खडेबाजार पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पोलीस पुढील शोधकार्य करत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेली सर्वात मोठी चोरी असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. दरम्यान खडेबाजार व मार्केट पोलिसांनी रात्रीच्या वेळी आणखीन जास्त वाढविण्याची गरज देखील व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *