बेळगाव : बेळगाव-दिल्ली आणि बेळगाव-पुणे या दोन महत्त्वपूर्ण विमानसेवेची सुरुवात होणार असल्याची माहिती बेळगावचे राज्यसभा सदस्य इरान्ना कडाडी यांनी दिली आहे. 1 ऑक्टोंबर पासून बेळगाव-दिल्ली दररोजची विमानसेवा सुरू होईल तर 29 ऑक्टोबर पासून स्टार एअरची बेळगाव-पुणे ही दररोजची विमानसेवा तर पुणे-बेळगाव ही इंडीगोची विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू होणार असल्याचे त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.
बेळगाव जिल्ह्याचा स्थानिक खासदार म्हणून मी इंडिगो आणि स्टार एअर या दोन्ही कंपन्यांचे बेळगाव-दिल्ली आणि बेळगाव-पुणे अशा दोन विमानसेवा सुरू केल्याबद्दल आभारही मानले आहेत. अद्याप दोन्ही एअरलाइन्सच्या वेळापत्रकाची माहिती देण्यात आलेली नाही. बेळगावात विमान प्रवासी वाहतुकीत वाढत असल्यामुळे सुविधांची संख्याही वाढवली जात आहे. यामुळे सध्या असलेल्या इमारतीत प्रवाशांची मोठी गर्दी होत होती.
Belgaum Varta Belgaum Varta