बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान टीमने तिसर्या रेल्वे गेट जवळ गटारीत असलेल्या गाईची सुटका करून जीवनदान दिले आहे.
मंगेश पेट्रोल पंपाजवळ बंद गटारीत गाय पडली होती याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बावा स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते दाखल झाले त्यांनी गटारीत पडलेल्या गायीची सुटका केली.
श्रीराम सेना हिंदुस्थानकडून गाईला वाचवण्यात त्वरीत मदत केल्याबद्दल अग्निशमन दल आणि बावा स्वयंसेवी संस्थेचे आभर व्यक्त करण्यात आले. यावेळी नरू निलजकर, आतिश धातोंबे, शुभम सुतार, अवदूत तुडवेकर, संतोष दरेकर, चेतन कांबळे, अनिल पाटील, अँथनी जेवाकुंतला आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta