Tuesday , March 3 2026
Breaking News

संगमेश्वर नगर येथे भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात बालक जखमी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरातील संगमेश्वर नगर येथे आज भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात आठ वर्षांचा बालक गंभीर जखमी झाला आहे.

संगमेश्वर नगर येथे राहणाऱ्या अर्कान रियाज नामक आठ वर्षांच्या कोवळ्या बालकावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याचे अनेक ठिकाणी चावे घेतले. विशेषतः त्याच्या डोक्याला कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर इजा झाली आहे. त्याच्या किंचाळण्याने परिसरातील नागरिकांनी कुत्र्यांना हाकलून लावत त्याला सोडविले. अत्यंत घाबरलेल्या अर्कानला तातडीने उपचारांसाठी केएलई इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने संगमेश्वरनगर परिसरात खळबळ माजली असून, महापालिकेने तातडीने भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखावा अशी मागणी करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *